पेडगाव किल्ला संवर्धनाने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती साजरी

0 14
  श्रीगोंदा :-  छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पेडगावचा बहादूरगड/धर्मवीरगड साक्षीदार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडगावी गनिमी कावा वापरत २०० अरबी घोडे व एक कोटीचा शाही खजिना मिळवला होता.हा परिसर पराक्रमी व स्वाभिमानी इतिहास सांगत आहे.त्यामुळे टीम धर्मवीरगड,शिवदुर्ग संवर्धन,पेडगाव शिवजयंती उत्सव समिती  व समस्त शिवप्रेमींनी भव्य शिवजन्म उत्सवाचे केले होते.
  सिनेअभिनेते सयाजीराजे शिंदे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने पेडगावच्या गडावर प्रसन्ना पोपटराव पवार हिवरे बाजार यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व श्रमदान करून  शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, शिवजयंती  निमित्त  प्रथम धर्मवीर गडावर  छत्रपती शिवाजी  महाराजांच्या  पुतळ्याचे व छत्रपती संभाजीराजेच्या शौर्य स्तंभाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पेडगावच्या ऐतिहासिक किल्यावर प्रथमच खूप मोठ्या प्रमाणात  यावर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली, यावेळी ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कुलच्या बालमावळ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा व पथनाट्या च्या कार्यक्रमाने सर्वांची मने जिकुंन घेतली,यासाठी पानसरे मॅडम व पानसरे सर,व त्यांच्या पूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.

मास्क वापरा,कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका- अजित पवार 

  छत्रपती शंभुराजेंच्या शेवटच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड / बहादूरगड आहे.जी भूमी शंभुराजेंच्या रक्ताने माखली त्या भूमीला आपली आस आहे.छत्रपती शंभुराजेंचा स्वाभिमानी बाणा व स्वराज्यासाठीच्या असह्य वेदना पेडगाव किल्यात घुमत आहेत.त्या पवित्र तेजोभूमीला वृक्षारोपण करत हरित साज चढवत आपण शंभुराजेंना अभिवादन केले व लवकरच बहादूरगडला भेट देऊन शंभूराजेंना अभिवादन करणार आहोत,असे मत सयाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले.
Related Posts
1 of 1,301

सावधान ; कोरोना वाढतोय ,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

पेडगाव किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी टीम धर्मवीरगड कार्यरत आहे.पेडगाव गडाचे संवर्धन टीम धर्मवीरगड व ७ वर्षांपासून श्री शिवदुर्ग संवर्धन करत आहे.टीम धर्मवीरगडने संवर्धन हेतू अनेक कामे केली आहेत 35गावातील टीम तयार करून स्मारकाचे ३६५ दिवस नित्याने पूजन केले जाते.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून टीम धर्मवीरगडने २० सिमेंटी खुर्च्या,२ पाणपोई ,स्मारक परिसर लॉन,५ सिमेंट नळ्याचे आउटलेट,३ कचराकुंडी,कट्टर मशीन,कुऱ्हाडी,कोयते,खुरपे, चपर,खोरे,कुदळ,टिकाऊ,घमेले,१०० भगवे ध्वज,५००० लिटर पाण्याची टाकी,१००० फूट ठिबक सिंचन पाईप,२ पाणी बॅरल इत्यादी वस्तूंचे अनावरण करत किल्याच्या सेवेत रुजू केले.

पाताळेश्वर मंदिर लोखंडी प्रवेशद्वार व श्री छत्रपती संभाजीराजे उद्यान निर्माण केले आहे.भविष्यात किल्यात प्रकाश व्यवस्था,श्री छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय,श्री छत्रपती संभाजी महाराज  खेळणी घर पुरातत्व खात्याचा सल्याने निर्माण केली जाणार  आहेत. टीमने गडाची माहिती देणारी दिनदर्शिका निर्णन करून १०००० प्रतीचे वितरण पूर्ण महाराष्ट्रात केले आहे.
या अनोख्या गडसंवर्धन शिवजयंती प्रसंगी बाळासाहेब पानसरे,भगवान कणसे,देविदास शिर्के,डॉ.निलेश खेडकर, प्रशांत ओगले,राजेश बाराते, प्रतीक पाचपुते,,तेजस खेडकर,सचिन झिटे,सिद्धांत खेडकर,शिवाजी नवले,शेखर खेडकर,शशिकांत खेडकर, विशाल खेडकर,किरण कवडे,सागर घोडके, कुंदन खेडकर,विकास राऊत ,प्रणिल काराळे,भाऊ घोडके,नंदकिशोर क्षीरसागर,राहुल परकाळे,दादा डाळिंबकर,आकाश लगड,समस्त ग्रामस्थ पेडगाव व महाराष्ट्रातील शिवप्रेमी-शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: