बेलवंडी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न…

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा – मानननिय सर्वोच्च न्यायालय च्या आदेशानुसार सार्वजनिक जयंती उत्सव मध्ये डीजे ला वाजवण्यास बंदी असल्या कारणाने बेलवंडी पोलीस स्टेशन ला आज सकाळी श्रीराम नवमी, महात्मा ज्योतिराव फुले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती व गावातील यात्रा उत्सव निमित्त बेलवंडी पोलीस ठाण्यात ( Belwandi police station) कर्जतचे विभागीय पोलीस अधिकारी माननीय अण्णासाहेब जाधव (Annasaheb Jadhav) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व जयंती उत्सव साजरे करणारे मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक उत्सव व जयंती उत्सव मध्ये डीजे वाजवण्यास बंदी असणार आहे.तरी सर्वांनी पारंपरिक वाद्य वाजवून जयंती उत्सव व यात्रा उत्सव साजरे करावेत. जर कोणी डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांनी सण-उत्सव जयंती उत्सव, यात्रा उत्सव शांततेत साजरे करावेत अशा सूचना संबंधित गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष यांना देण्यात आल्या. पुढे बोलताना जाधव साहेब म्हणाले की नाचण्याचे वेड लागण्यापेक्षा वाचनाचे वेड लागले पाहिजे तरच भावी पिढी सक्षम होईल. डीजे लावण्यापेक्षा रक्तदान शिबिर अन्नदान सार्वजनिक पानपोई असे उपक्रम या जयंती उत्सवानिमित्त राबविण्यात यावे. असे आवाहन पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले.
या बैठकीत मार्गदर्शन करताना बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ साहेब यांनी सांगितले की आपल्या गावातील तरुण डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस, पीएसआय, कलेक्टर, तहसीलदार होण्यासाठी आपल्या गावात एक चांगले ग्रंथालय सुरू केले पाहिजे आणि तेथे सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे.अशा उत्सवामधून पैसे वाचवून चांगले ग्रंथालय व व्यायाम शाळा सुरू करावे.डीजे वाजवणे पेक्षा आणि यात्रा उत्सव मध्ये इतर खर्च करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये सुसज्ज ग्रंथालय आणि अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू करा जेणेकरून आपल्या गावातील तरुण चांगल्या पदावर अधिकारी म्हणून रुजू होतील त्यामुळेच आपल्या गावचे नाव संपूर्ण राज्यामध्ये नावारूपाला येईल म्हणून सर्वांनी डीजे मुक्त जयंती उत्सव शांतते मध्ये साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ साहेब यांनी केले. यावेळी बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.