DNA मराठी

अहमदनगरमधील नेवासकर पेट्रोल पंपावरील ‘ती’ पाटी चर्चेत; सोशल मीडियावर व्हायरल

0 926
pati at Newaskar petrol pump in Ahmednagar; Viral on social media
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर –   मागच्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel)दरांनी आणखी भर टाकली आहे. देशातील बहुतेक शहरात पेट्रोलचे दर 120 पर्यंत पोहोचले आहे. तर डिझेलचे देखील दर शंभरच्यावर गेले आहे. यामुळे अनेक नागरिकांचे बजेट बिघडले आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणात करण्याची मागणी होत असून वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून सोशल मीडिया यूजर्स विरोध दर्शवत आहे. यातच अहमदनगर शहरात असणाऱ्या नेवासकर पेट्रोल पंपावर (Nevaskar Petrol Pump)लावण्यात आलेल्या एका पाटीची चर्चा देखील सोशल मीडियावर जोराने होत. आता पर्यंत सोशल मीडियावर या पाटीला हजारो लाईक्स आले आहे. पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,’ अशी पाटी पंपावर लिहिण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,448
पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पंपावर दररोज वेगवेगळे बोर्ड लिहितात. कधी सुविचार तर कधी चारोळी ते लिहितात. यातून पंपावर येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन तर होतेच, पण कधी कधी त्यांच्या जीवनाला एखाद्या सुविचाराने कलाटणी मिळते, असं बोरा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलने कधीच शंभरी पार केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे. देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकलं जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही झालेला आहे.अहमदनगरमध्ये आज पेट्रोलचा दर 120.03 रुपये प्रति लिटर इतका आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: