DNA मराठी

परिणीती चोप्राने दिले राघव चढ्ढासोबत लग्न संकेत! पहिल्यांदाच मौन सोडले…..

आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत डिनर व नंतर लंचसाठी दिसल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आलेली आहे.

0 14

नगर : गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा घडत असून तसे वृत्त येत आहेत. दोघेही लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही़कडून याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत डिनर व नंतर लंचसाठी दिसल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आलेली आहे. यानंतरही अफवा व बातम्यांचा सिलसिला थांबलेला नाही. रोज काही ना काही अपडेट येतच असतात. कधी एंगेजमेंट बद्दल तर कधी लग्नाबद्दल. याविषयी दोघेही आतापर्यंत उघडपणे काहीही बोलले नव्हते, मात्र आता परिणीतीने यावर मौन सोडले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून असे वाटते की त्यांनी राघवसोबत लग्नाचा इशारा दिला आहे.

Ramdas Athawale – रामदास आठवले यांचा फडणवीस, विखेंना प्रस्ताव…
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लवकरच दिल्लीत एका इंटेमेट एंगेजमेंट सेरेमनीद्वारे त्यांचे नाते अधिकृत करणार असल्याचा दावा अनेकांनी केले आहे. प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनीही अलिकडेच भारताला भेट दिली होती. ज्यामुळे ते कुटुंबातील इतर सदस्यांसह समारंभात सहभागी होतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
सध्या मीडियामध्ये परिणीती चोप्राच्या पर्सनल लाईफची बरीच चर्चा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा 34 वर्षीय अभिनेत्रीला याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की डिस्कस व अपमान यात खूप पातळ रेषा आहे. ती म्हणाली की असे झाले तर काही गैरसमज असेल तर ती साफ करेल! जर स्पष्टीकरण देणे आवश्यक नसेल तर ती स्पष्टीकरण देणार नाही.

Related Posts
1 of 2,492
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: