पालकांनो सावधान…! आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देता का ?

0 335

 अहमदनगर  –   पालकांनो (Parents ) सावधान, आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल (Mobile) देत आहात  तर ही बातमी नक्की बघा.  कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोन (Smart phone) हा संपर्क आणि शिक्षणासाठी प्रभावी माध्यम ठरत असला, तरी याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या सहाय्याने शिक्षिकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकणे, असे धक्कादायक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिकेच्या फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले आहेत. त्या शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य केले जात होते. दुसऱ्या शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला होता. एका विद्यार्थ्याचा फोटो आणि मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला, तर चौथ्या प्रकरणात एका शालेय मुलीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल करण्यात आले. पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर, तपासात हे गुन्हे करणारे ओळखीचेच अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले.

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांच्या हातात दिवसभर मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षणा बरोबरच मुलांचा सोशल मीडियाकडे कल वाढला आहे. अस असल तरी पालकांनी आपला पाल्य शिक्षण घेता घेता इंटरनेटचां वापर आणखीन कुठल्या गोष्टीसाठी करतोय, त्यात तो काय करतो आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.पालकांनी लक्ष ठेवल्याने मुलाना आपण चुकीचे काही करत नाही ना असा धाक बसेल.
Related Posts
1 of 1,481
आजचे युग हे आधुनिक युग समजल जात. मोबाईल आणि इंटरनेट आता जीवनाचा एक भाग झाला आहे. याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी जसा केला जातो तसा त्यातून काही वाईट गोष्टी देख घडत असतात . विशेष तहा मोठ्या माणसांना या सोशल मीडियातील जेवढी माहिती नसते तेवढी  लहान वयात आत्ताच्या पिढीला आहे. परंतु हीच लहान बालक चुकुन आपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा करत आहोत हे लक्षात येतं नाही. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना या सायबर गुन्ह्यात अडकण्यापासून वाचऊ शकता. कारण सायबर क्राईम मध्ये आता अल्पवयीन मुलांचा वाढता आलेख ही विचारकरायला लावणारी बाब आहे.  अशी प्रतिक्रिया प्रतिक कोळी पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राईम यांनी दिली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: