पालकांनो सावधान! Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0 164

 सूरत –   आज संपूर्ण देशात दिवाळी (Diwali) चा सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त लहान मुलांना आवडणारे विविध प्रकारचे फटाके (Firecrackers)  आई – वडिल (Mom – Dad)  आपल्या घरी घेऊन येतात. हे फटाके उडवून लहान मुले आपला आनंद साजरा करत असतात मात्र हा आनंद साजरा करताना कधी कधी गंभीर स्वरूपाचा अपघात देखील घडत असतो. (Parents beware! 3-year-old dies after eating pop-up firecrackers)

अशीच एक घटना गुजरातमधील सुरत या शहरात घडली आहे. सुरतच्या एका परिसरात तीन वर्षाच्या मुलानं पॉप-अप ( Pop-Up ) हा फटका खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणाबाबत बोलताना त्याच्या वडिलांनी सुरतच्या डिंडोली येथे आपल्या 3 वर्षाच्या मुलासाठी फटाके आणले होते. मूल लहान असल्यानं हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. यानंतर मुलानं फटाखा गिळला. त्यानंतर तो आजारी पडला आणि बरा झाला नाही. अतिसार आणि उलट्यात पॉप-अप फटाके फुटल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित करण्यात आला.   यासोबतच सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

“या” कारणाने भाजपचा देगलूरमध्ये पराभव प्रवीण दरेकरांनी सांगितलं कारण

Related Posts
1 of 1,481

मुलाच्या पोटातून फटाका काढल्यानंतर त्याला मृत घोषित केल्यानं डॉक्टरांनाही वाईट वाटलं आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बिहारचे रहिवासी असलेले राज शर्मा हे सुतारकाम करतात. त्यांनी सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच मुलांसाठी फटाके आणले होते. मात्र मुलानं फटाका केव्हा खाल्ला हे समजले नाही. अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचा मेसेज दिला आहे.

राज शर्मा यांनी सांगितलं की, ते कुटुंबासह 8 महिन्यांपूर्वीच बिहारहून सुरतला आले होते. राज शर्मा यांचा पत्नी, 3 वर्षांचा मोठा मुलगा शौर्य आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 24 तासांपासून शौर्य अचानक आजारी पडल्यानं त्यांना त्याची काळजी वाटत होती. त्याला उपचारासाठी जवळच्या डॉक्टरांनाही दाखवण्यात आले. अचानक मुलाला उलट्या होऊ लागल्याने त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं. यावर डॉक्टरांनी त्याला ड्रिप लावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केलं. (Parents beware! 3-year-old dies after eating pop-up firecrackers)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: