राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत परभणीचा डंका, मुलींमध्ये अश्विनी जाधव व मुलामध्ये किरण म्हात्रे प्रथम

0 10

जामखेड –  राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत मुले व मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत परभणीच्या किरण म्हात्रे याने १५ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये अश्विनी जाधव हिने आठ कि. मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून परभणीचा डंका वाजवला. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने बुधवार दि. २७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय भव्य “हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन बारामती अँग्रीकल्चर ट्रस्टच्या संचालिका सुनंदाताई पवार यांनी केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, इंदूर मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष युवराज काशिद, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी क्रिडा संचालक पोपटराव धनवे, माजी समाजकल्याण अधिकारी सुभाष लोळगे, विनय दाभाडे, संतोष जाधव, पै. विशाल माने, मिलींद जपे, क्रिडा विभागाचे प्राध्यापक मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, शहाजीराजे भोसले, सुरेश भोसले, मयुर भोसले, अयोजक बबनकाका काशीद, संतोष पवार, अजय काशिद आदी उपस्थित होते.

    फोटो दिला नाही तर तुझी बदनामी करणार अशी धमकी देणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी केली अटक

  या स्पर्धेत विजेते मुले व मुली पुढीलप्रमाणे 

मुलांच्या १५ कि. मी अंतर धावणे मध्ये परभणीच्या किरण म्हात्रे याने ४६ मिनटात स्पर्धा पुर्ण करून ११००० रूपये प्रथम पारितोषिक पटकावले, व्दितीय क्रमांक छगन बोंबले याने ४७ मिनटात अंतर पार करून ७००० रूपये पारितोषिक मिळवले, तृतीय बक्षिस पाथर्डीच्या किशोर मरकड याने ४७ मिनिटे २३ सेकंदात पार करून ५००० रूपये बक्षीस पटकावले, चतुर्थ ३००० रूपये बक्षीस दिनकर लिलके याने ४८ मिनिट ५० सेकंद , पाचवे बक्षीस विशाल चव्हाण याने ४९ मिनिटात पार करून २०००,रुपये बक्षीस मिळवले. तर मुलींच्या आठ कि. मी धावणे स्पर्धेत परभणीच्या अश्विनी जाधव हिने ३१ मिनटात पार करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५००० रूपये पटकावले, व्दितीय क्रमांक विशाखा बास्कर हिने ३४ मिनटात अंतर पार करून ४००० रूपये पारितोषिक मिळवले, तृतीय क्रमांक जयश्री मालवंडे हिने ३७ मिनटात पार करून ३००० रूपये बक्षीस मिळवले, चतुर्थ क्रमांक सुप्रिया कोळेकर हिने ३७ मिनिट ५० सेकंदात अंतर पार करून २००० रूपये बक्षीस मिळवले, पाचवे १००० रूपये बक्षिस मोहिनी बडे हिने ३८ मिनटात अंतर पार करून पटकावले. तसेच ज्येष्ठामध्ये कामगार तलाठी इराप्पा काळे, द्वितीय निवृत्त शिक्षक बाळकृष्ण जगताप व तृतीय गणेश झगडे व चतुर्थ माजी सैनिक बबन नाईक यांनी १५ कि. मी धावणे स्पर्धेत भाग घेउन मिळवले. याशिवाय या स्पर्धेत भाग घेतलेल्यां ५६० जणांना प्रमाणपत्र  देण्यात आले.

Related Posts
1 of 1,290

यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या तरुणांत वाढती व्यसनाधीनता व आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जंकफुड व व्यसने टाळून तरूणांनी पोष्टीक आहार व व्यायामाची जोड देऊन शरीर तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केल. यावेळी बोलताना मल्लविद्या संस्कार कुस्ती फौंडेशनचे अध्यक्ष बबनकाका काशीद म्हणाले, राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर युवक व युवतींनी सहभाग नोंदवला यापुढील काळात तालुक्यात सातत्याने विविध प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेऊ व सातत्य ठेवू.

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षाचे काम केले म्हणून घरात शिरून केला महिलेचा विनयभंग

सध्याच्या तरूणांना असलेले मोबाईलचे व्यसन व व्यसनाधीनता मोडून काढण्यासाठी आमचे फौंडेशन यासाठी प्राधान्य देणार आहे. तरूण तरूणी व वयस्कर व्यक्ती या सर्व क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले व आपले दैनंदिन जीवनात निर्व्यसनी व तंदुरुस्त शरीर राहतील यासाठी व्यायाम, योगा, खेळ या माध्यमातून प्रयत्न करू. यापूर्वी आम्ही कै.  विष्णु वस्ताद यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा दरवर्षी अयोजीत करतो या कुस्तीसाठी राज्य, देश पातळीवरील मल्लांनी हजेरी लावून सहभाग नोंदविला आहे हे जामखेड करांनी पाहिले आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल प्रा. मधुकर राळेभात यांनी सर्व सहकार्याचे व भाग घेणा-या स्पर्धकांचे आभार मानले.

                                              सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची पळवापळवी सुरू

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: