परमबीर सिंग यांना न्यायालयाकडून धक्का, दिला “हा” आदेश

0 343

नवी मुंबई –  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीच्या आरोप लावत चर्चेत आलेले मुंबई पोलीस माजी आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Magistrate Court) परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधातील हे आतापर्यंतचे तिसरे वॉरंट आहे.

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्धमरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी ते न्यायालयात हजर होत नसल्याने न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.

Related Posts
1 of 1,603

यापूर्वी मुंबई व ठाणे येथील खंडणी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. आता पर्यंत त्यांच्याविरुद्ध तीन अटक वॉरंट काढले असून परमबीर यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे.

धक्कादायक !पगार वेळेवर न दिल्याने मालकाच्या चार वर्षे मुलाचा अपहरण, गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: