पंकजा मुंडे यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर – रामदास आठवले

0

पुणे  –   केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबद्दला नंतर राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चर्चेचा विषय बनले आहे. आता त्यांच्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale )  यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde)  गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वाना न्याय देता येईल. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल,असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करावी

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे, असे आठवले म्हणाले.

लोणावळा जाण्याअगोदर वाचा ही बातमी, प्रशासनाकडून मोठा निर्णय

Related Posts
1 of 1,184
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: