अधिवेशनाच्या कामकाजावरून पंकजा मुंडे यांनी दिला भाजपाला घरचा आहेर; म्हणाले,राजीनामा.. 

0 308
Pankaja Munde gave BJP a home run from the convention proceedings; Said, resignation ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 
 मुंबई –   नुकताच राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपला आहे. या अधिवेशनातील कामकाजावर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी प्रतिक्रिया देत नाराजी दर्शवली आहे. राजीनामा (Resignation) मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसलं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, असा टोला टोला पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीसह भाजपला लावला आहे.
या अधिवेशनात फक्त विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik)  यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती.यावरून पंकजा मुंडे यांनी टीका करत भाजपाला देखील घरचा आहेर दिला आहे.
Related Posts
1 of 2,357

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाले कि केंद्र सरकारच्या कामगिरीवर देशातील जनता खूष आहे, असं त्या म्हणाल्या. सरकारकडे मागणी मागायचा संघटनांचा हक्क असतो. सरकार त्या नक्कीच पूर्ण करेल. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या लोकांची मी प्रतिनिधी आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकारने त्यांच्या पक्षातील लोकांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी एसटी संपावरून राज्य सरकारवर टीका केली. एसटीबाबत व्यवस्थित चर्चा झाली नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे हा वाद चिघळला आहे, असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर पडलेल्या धाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. तपास यंत्रणा तपास करतील. मी फार बोलणार नाही. मुख्यमंत्री सभागृहात काय बोलले हे मी ऐकलं नाही, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने काही पावलं उचलली आहेत. पण निवडणुका जेव्हा कधी होतील तेव्हा त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत ही माझी आधी पासूनच भूमिका आहे, असंही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी आता पर्यंत काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला नसल्याचंही स्पष्ट केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: