पाकिस्तानचा विजय .. मात्र सोशल मीडियावर धोनीचा “तो” वक्तव्य व्हायरल

0 1,639

नवी मुंबई –    तब्बल १२ विश्वचषक (World Cup) सामन्यानंतर काल पाकिस्तान (Pakistan) संघाने टी – २० विश्वचषकच्या सुपर- १२ च्या सामन्यात भारता (India) ला पराभूत करून ही मालिका तोडली मात्र भारतीय संघाच्या या पराभवांतर सोशल मीडिया (social media) वर अनेक जण भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय संघाचा मेंटॉर एम. एस. धोनी (M. S. Dhoni) चा पाच वर्षांपूर्वीचा एक वक्तव्य व्हायरल करत आहे. टी -२० विश्वचषक २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत एमएस धोनीने एक वक्तव्य केले होते त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

एमएस धोनी टी -२० विश्वचषक २०१६ सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, आम्ही ११-० असा विजय मिळवला याचा आम्हाला अभिमान आहे. पण भविष्यात आपण कधीतरी नक्कीच हरणार हेही एक सत्य आहे. तुमचा आज पराभव होईल किंवा १० वर्षांनंतर होईल, २० वर्षांनी होईल किंवा ५० वर्षानंतर होईल. कारण असे कधीच होणार नाही की तुम्ही सतत जिंकत राहाल. एमएस धोनीच्या या वक्तव्याला तब्बल ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सलग १२ विजयानंतर टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला आहे.

Related Posts
1 of 58

त्यानंतर पुनरागमन करणे सोपे नव्हते पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया…..

भारताने पाकिस्तान विरुद्ध एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ७ वेळा विजय मिळवला. त्याने ५ टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर २०११ आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: