आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार

0 446

नवी  मुंबई –    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) आणि पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांच्यावादातून राष्ट्रवादी नेते महेबूब शेख (Mahboob Sheikh) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. काही दिवसापूर्वी महेबूब शेख यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका करत लाचखोराची बायको म्हणून डिवचले होते. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील  टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला होता.  (Our father did not teach us this. Chitra Wagh’s retaliation against Mehboob Sheikh)

आता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी नेते महेबूब शेख यांच्यावर टीका करत त्यांना उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत चित्रा वाघ यांनी मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याचं मुलं म्हणून हिणवणार नाही, असा पलटवार केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि  मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जात आहे. तरी ही मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही, असा हल्लाबोल वाघ यांनी केला आहे.

Related Posts
1 of 1,512

 

विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं… या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा, असं आवाहन करतानाच मी तुमच्यासोबत आहे. मी आवाज उठवत आहे आणि उठवत रहाणारचं, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.(Our father did not teach us this. Chitra Wagh’s retaliation against Mehboob Sheikh)

पोलीस शिपाई भरती परीक्षेत बाहेरून ब्ल्यूटूथद्वारे उत्तर मागवणारा मुन्नाभाईला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: