…अन्यथा आम्हीही आत्महत्या करु; दिशा सालियानच्या आई-वडिलांचं उद्धव ठाकरेंना पत्र

0 312
… Otherwise we will commit suicide; Letter from Disha Salian's parents to Uddhav Thackeray

 

मुंबई –  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियाच्या (Disha Saliya) मृत्यूचा वाद संपता दिसत नाही. पोलीस तपासात तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालं होतं. तसेच तिच्या कुटुंबियांनीही ही आत्महत्या असल्याचे मानले होते. मात्र दिशाच्या मृत्यूवरुन सुरु असलेले राजकारण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर दिशाच्या पालकांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. दिशा सालियनच्या पालकांनी राष्टपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना पाठवलेले हे पत्र ५ पानी आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूवरुन राजकारण केले जात आहे, असा आरोपही दिशाच्या पालकांनी केला आहे.

दिशाच्या पालकांनी राष्ट्रपतींना दिलेले हे पत्र ५ पानांचे असून त्यात त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर अनेक आरोप केले आहे. ते आमच्या मुलीची दिशाची प्रतिमा खराब करत आहेत, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या, अन्यथा आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग, असे ही त्यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे.

त्यासोबतच ते म्हणाले की, आमच्या मुलीचे नाव काही राजकारण्यांना बदनाम करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही (मी आणि माझी पत्नी) या देशातील महत्त्वाच्या लोकांना आवाहन केले आहे. हाच अर्ज आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाही पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Posts
1 of 2,428

यापूर्वी दिशा सालियनच्या आईनेही केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होता. ते दोघेही आमल्या मुलीच्या मृत्यूबाबत खोट्या गोष्टी पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले होते. दिशा सालियनची हत्या करण्यात आली, ती गर्भवती होती आणि मृत्यूपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा राणे आणि त्यांच्या मुलाने केला होता. या आरोपांवर दिशाचे कुटुंबीय चांगलेच संतापले होते.

दिशा सालियन ही मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांत व्यतिरिक्त दिशाने भारती सिंह, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासात ही स्पष्ट आत्महत्या असल्याचे सांगितले होते. तसेच या प्रकरणी तपासात कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळालेला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: