मी नाहीतर जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे – अण्णा हजारे

0 549
अहमदनगर –   देशात महागाई दिवसा दिवस वाढत आहे. शेतकरी मागच्या नऊ महिन्यापासून आंदोलन करत आहे मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare) कोठे गेले ? अण्णा, झोपले की काय?  असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर अण्णा हजारे यांचयाबद्दल उपस्थित होत असतात या सर्व प्रश्नांवर आज अण्णा हजारे यांनी उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी जनतेवरच झोपल्याचा आरोप केला आहे. ‘जनताच कुंभकर्णासारखी ( Kumbhakarna) झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे. ( Otherwise, the people are sleeping like Kumbhakarna – Anna Hazare )
अण्णा हजारे  म्हणाले, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळे सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असंही हजारे म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. ‘तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. तुम्ही दिल्लीला हलवू शकता, त्यामुळं आम्ही तुमच्याकडं आलो आहोत, असं कार्यकर्ते हजारे यांना म्हणाले.
Related Posts
1 of 1,518
त्यावर  अण्णा हजारे  म्हणाले, ‘शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा. मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गानं जात आहात. तेव्हा मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल. मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करीतच आहोत. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनीही आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिला आहे. करोनामुळे समिती स्थापन झाली नाही. तरीही आपण पाठपुरावा करत आहोत,’ असंही अण्णा यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
देश बचाव जनआंदोलन समितीनं मागच्या  आठवड्यात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देशात सुरु असणाऱ्या विविध प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडून प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करावे अशी मागणी केली होती .  अन्यथा  राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे हजारे यांच्याकडून समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.( Otherwise, the people are sleeping like Kumbhakarna – Anna Hazare )
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: