
अहमदनगर – मराठा सेवा संघ ( Maratha Seva Sangh)अहमदनगर व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मराठा सेवा संघाच्या विचारने तसेच पुरोगामी विचाराने समाजात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तसेच समाजासाठी उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मध्यंतरी कोरोणाच्या आपत्तीच्या काळात हे पुरस्कार देता आले नसल्याने या वर्षी मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्थेच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.