राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0 429
Organizing a cricket tournament on the occasion of Rajendra Nagwade's birthday
 
श्रीगोंदा :- ” सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि . चे चेअरमन मा . राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर दि . १ मे ते १४ मे २०२२ अखेर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणेत आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष आर . एस . नाईक यांनी दिली .
 सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा . श्री . राजेंद्र दादा नागवडे यांचा दि . १४ मे रोजी वाढदिवस असुन सदर वाढदिवसाचे औचित्य  साधुन राजेंद्रदादा नागवडे मित्रमंडळ व कारखाना सांस्कृतिक व क्रिडा मंडळाचेवतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करणेत आलेल्या आहेत . दि . १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मा . श्री . राजेंद्रदादा नागवडे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मा . सौ . अनुराधाताई नागवडे यांचे शुभहस्ते व मान्यवर अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होत असुन दि . १४ मे रोजी अंतीम सामना होवून विजेत्या , उपविजेत्या संघांसह इतर खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे .

 

सदर स्पर्धेत आतापर्यंत १२० संघानी आपली नाव नोंदणी केलेली असुन  सदरच्या स्पर्धा या डे – नाईट खेळल्या जाणार आहेत . या स्पर्धेतील पहिले बक्षिस रु .१,२१,००० / – चे सांस्कृतिक मंडळामार्फत , दुसरे बक्षिस रु .७७,७७७ / – श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा सौ . शुभांगीताई पोटे यांचेतर्फे , तिसरे बक्षिस रुपये ५५,५५५ / – कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा . श्री . बाबासाहेब भोस यांचेतर्फे आणि चौथे बक्षिस रुपये- ३३,३३३ / – चे श्रीगोंद्याचे नगरसेवक श्री . प्रशांत गोरे व सामाजिक कार्यकर्ते श्री . किरण कुरुमकर यांचेतर्फे दिली जाणार आहेत . या शिवाय मॅन ऑफ दि सिरीज करीता कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांचेतर्फे रेफ्रिजरेटर , बेस्ट बॅटस्मनसाठी माजी संचालक सचिनराव कदम यांचेतर्फे एल.ई.डी.टी.व्ही , बेस्ट बॉलरसाठी कारखान्याचे संचालक शरदराव जगताप यांचेतर्फे एल.ई.डी.टी.व्ही , उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरीता पोपटराव नागवडे यांचेतर्फे कुलर आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक करीता पोपटराव मचाले यांचेतर्फे स्पोर्ट सायकल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत .

 

 

एस . एस . टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलचे मालक श्री . संतोष नागवडे यांचेकडून टी – शर्ट सौजन्य दिले जाणार आहे . सदरचे सामने एलईडी स्क्रिनवर दाखविले जाणार असुन सर्व सामने पहिल्या दिवसापासुन यु टयुबवर लाईव्ह दाखविले जाणार आहेत . या स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता युवानेते पृथ्वीराज नागवडे , संचालक बंडू जगताप , विठ्ठल जंगले , प्रमोद शिंदे , मधुकर काळाणे , एस . एस . के . क्रिकेट क्लब तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ , खाते प्रमुख विभागप्रमुख व कामगार प्रयत्नशील असुन पंचक्रोशील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन रमाकांत नाईक यांनी केले आहे .
Related Posts
1 of 2,282
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: