पत्नीचा अनैतिक संबंधाला विरोध; पतीने प्रेयसीच्या नादाला लागून उचलला टोकाचा पाऊल

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
कैमूर- पत्नीने (Wife) पतीच्या (Husband)अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या (Murder)केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील कैमूर येथे घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी करवाई करत 36 तासांत आरोपी पतीला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या मैत्रिणीला हत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी भाबुआ रोड रेल्वे स्थानकावरुन अटक केली आहे.जनक चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील बागिनी गावात घडली आहे. 15 एप्रिलच्या रात्री जनक चौधरी याने पत्नीला घरातून बांसवाडीमध्ये नेऊन धारदार शस्त्राने वार केले. घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरुन फरार झाला होता. ही धक्कादायक बातमी सासरच्या मंडळींना समजताच, मृतकाच्या सासूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
तसेच, मोहनियाचे डीएसपी फैज अहमद खान यांनी सांगितले की, ”एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर त्याने एका महिलेशी फोनवर बराच वेळ बोलल्याचे आढळून आले. टेक्निकल पुराव्याच्या आधारे आरोपी पतीला रोहतास जिल्ह्यातील दालमियानगरमधून अटक करण्यात आली आहे. तर त्याची गर्लफ्रेंड रुबी देवी हिला भाबुआ रोड रेल्वे स्टेशन येथून अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
याशिवाय, दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्रही जप्त केले. याशिवाय डीएसपी फैज अहमद खान यांनी सांगितले की, ”आरोपी तरुणाचे त्याच गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दुसरीकडे मात्र पत्नीचा या संबंधाना विरोध होता. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. मृत महिलेला तीन मुले आहेत.