
अहमदनगर- भैरवनाथ सोसायटी ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामधेनू आहे. त्यामुळे ही कामधेनू वाचवण्यासाठी भटक्या व विमुक्त समाजाने आज बेलवंडी येथे अण्णासाहेब शेलार यांच्या पॅनल ला पाठिंबा दिला असे प्रतिपादन लोकहीत प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रमोद काळे यांनी बेलवंडी येथे केले.
रवनाथ बेलवंडी सेवा संस्थेची निवडणूक 11 जून ला होणार असून त्याआधीच बेलवंडी मध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. भटक्या व विमुक्त समाजातील सभासदांनी अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा देत कायम सोबत राहण्याची शपथ घेतली आहे.
भटक्या व विमुक्त समाजातील सर्व बांधवांनी अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या पॅनल चे पारडे यामुळे जड झाले असून विरोधी गटाला मोठा धक्का बसला आहे.
अण्णासाहेब शेलार मित्र मंडळाच्या वतीने या सर्वांचा फेटा बांधून सन्मान केला.त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले, लोकहीत प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रमोद काळे,बबन भोसले, सचिन काळे,राजू काळे, अजय चव्हाण, अतुल चव्हाण ,राहुल भोसले,नितीन भोसले,अविनाश चव्हाण, फुलचंद भोसले,रामसिंग भोसले, तुषार चव्हाण,नवनाथ भोसले, जांभळ्या भोसले यांसह आदींनी शेलार यांना पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सर्व समाजबांधवाचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. भविष्यात भटक्या व विमुक्त समाजातील बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.त्याचबरोबर अजून अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत येणार असल्याने ही निवडणूक 13 -0 होणार यात काही शंका नाही असेही शेलार म्हणाले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाने,सोसायटी चे चेअरमन जयसिंग लबडे, व्हा. चेअरमन स्वप्नील घोडेकर,उपसरपंच उत्तम डाके,सोपान हिरवे,ग्रा. पं. सदस्य सलीम शेख,युवराज पवार, अरुण डाके, शरद इथापे,भगवान वैद्ययांच्यासह सभासद उपस्थित होते.
सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामधेनू असणारी भैरवनाथ सेवा सोसायटी निवडणुकीत बाहेरच्या लोकांनी लक्ष घातल्यामुळे ही सोसायटी वाचवण्यासाठी आम्ही अण्णासाहेब शेलार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अण्णासाहेब शेलार हे बहुजनांचे नेते आहेत त्यामुळे पुढील सर्व निवडणुकांमध्ये आम्ही आमचा सर्व समाज अण्णासाहेब शेलार यांच्या पाठीमागे राहणार आहोत. – अजित भोसले(ग्रा.पं. सदस्य, बेलवंडी)