पोलिसांच्या आशीर्वादाने श्रीगोंद्यात खुलेआम गुटखा विक्री?

श्रीगोंदा ;- राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ श्रीगोंद्यात अगदी सहजपणे उपलब्ध होतात काही ठिकाणी कारवाई च्या नावाखाली गुटखा पोलिस पकडतात. तरीही शहरासह ग्रामीण भागात पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा पकडला जातो. तो विकणाऱ्यांवर कारवाईपण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही कारण या धंद्यात खुद्द पोलिसाच भागीदारी करत असल्याने सर्व काही अलबेल सुरु आहे असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे.