फक्त तीनच वयोवृद्धांनी घेतली कोविड लस ….

0 19

जामखेड –  साठ वर्षांवरील वयोवृद्धांना कोवीड लस मोफत असताना सोमवारी फक्त तीनच जणांनी लस घेतली त्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आई वडील व एका डॉक्टरचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्याच्या कोविड लसीकरणात आज दिवसभरात ३३ जणांना लस देण्यात आली. कोवीड लस सुरक्षित असून वयोवृद्धांनी लस घ्यावी असे आवाहन महात्मा फुले आरोग्यदायी योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी केले.

सोमवारी पहिल्या दिवशी तीन वयोवृद्धांनी नाव नोंदणी केली होती तसेच इतर काही जण आले होते परंतु सदर अँप्लीकेशन हॅंग झाले होते त्यामुळे नाव नोंदणी करता आली नाही. दुपारी तीन नंतर ते पुन्हा चालू झाले. वयोवृद्धांना लस देण्याचा सोमवार पहिला दिवस होता या दिवशी डॉ कल्याण काशीद जामखेड, नामदेव गेणा शिंदे व कमल नामदेव शिंदे (रा. चोंडी) या वयोवृद्ध पतीपत्नीने लस घेतली तर इतर शासकीय कर्मचारी, खाजगी डॉक्टर असे ३० जणांना लस देण्यात आली.

डॉक्टरने एकतर्फी प्रेमात घातला बुरखा आणि मग …

 कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग यामुळे वयोवृद्धांना मोफत लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या संदर्भात शासनाने को विन अँप्लीकेशन नावाचे अँप तयार केले आहे. सदर अप्लीकेशन प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करून त्यामध्ये नावनोंदणी करायची आहे तसेच ज्यांना शक्य नसेल त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट असे एक कागदपत्रे समक्ष घेऊन जाऊन नोंदणी करायची आहे.
तसेच ज्यांची वयोमर्यादा ४५ ते ५९ आहे . अशा व्यक्तींना गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे व ओळखपत्र असलेले कागदपत्रे ग्रामीण रुग्णालय किंवा शासनाने जाहीर केलेल्या हॉस्पिटलमधे लस दिली जाणार आहे यामध्ये जामखेड येथील ओम हॉस्पिटलचा समावेश आहे. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी तुम्ही काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेतो असे आवाहन करून पक्षामार्फत शहर व तालुक्यात जनजागृती साठी सोशल मिडिया व घरोघरी प्रचार करीत आहेत.
Related Posts
1 of 1,301

ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु – अजित पवार

सुधाकर शिंदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले आरोग्यदायी योजना महाराष्ट्र राज्य  –
कोविडची दुसरी लाट येत असून त्याच्यावर विजय मिळवयाचा असेल तर कोविड लस घेणे आवश्यक आहे. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ती घ्यावी तसेच ४५ ते ५९ वयोगटातील पुरूष महिला यांना असाध्य रोग असेल तर त्यांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणून ग्रामीण रुग्णालयात नोंदणी करावी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार ती घेऊन कोवीडवर मात करा 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: