तेव्हाच पगार वाढ मिळणार, अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा

0 356

 नवी मुंबई –  राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST worker) तीव्र संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी राज्य सरकारकडून  अल्टिमेट देण्यात आला होता. या अल्टिमेट नंतर अनेक कर्मचारी कामावर पुन्हा एकदा रुजू झाले होते. मात्र अनेक कर्मचारी आता पर्यंत देखील विलिनीकरणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. अशातच आता परिवहन मंत्री (Minister of Transport) अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक इशारा दिला आहे.(Only then will the salary increase, Anil Parab’s serious warning to ST employees)

कामावरुन काढण्याच्या भीतीमुळे  कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. यातच कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच फक्त पगार मिळणार असल्याचा गंभीर इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. मात्र सरकारनं अजून कर्मचाऱ्यांची विलिणाकरणाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे कर्मचारी तीव्र आंदोलन करत आहे. 

भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Related Posts
1 of 1,603

जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल,असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरू झाली आहे, तर 145 आगार अद्यापही बंदच आहेत.(Only then will the salary increase, Anil Parab’s serious warning to ST employees)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: