धनादेश अनादर प्रकरणी मुख्याध्यापकास एक वर्षाचा सश्रम कारावास

0 209
One year rigorous imprisonment for the headmaster in case of disrespect of check

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

श्रीगोंदा  –  उसने घेतलेल्या दोन लाखांच्या रकमेचा धनादेश न वठल्याने शशिकांत पांडुरंग पाटील यांस एक वर्षांचा सश्रम कारावास व ४ लाखांचा दंड अशी शिक्षा  श्रीगोंदा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्वाती जाधव यांनी सुनावली. या प्रकणातील आरोपी पाटील हा कर्जत येथील एका शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.

 शिवदत्त लक्ष्मण धस(रा.कोळगाव,ता.श्रीगोंदा) यांनी शशिकांत पाटील यांना दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत देताना आरोपी पाटील याने फिर्यादी धस यांना दोन लाखांचा धनादेश दिला होता. परंतु, हा धनादेश न वठल्याने शिवदत्त धस यांनी २००२ साली श्रीगोंदा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल देताना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्वाती जाधव यांनी आरोपी शशिकांत पांडुरंग पाटील यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर धनादेश रकमेकरिता ४ लाखांचा दंडही ठोठावला. एवढेच नव्हे तर दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकणातील आरोपी शशिकांत पाटील हा कर्जत(जि. अ’नगर) तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.  या खटल्यात दोन साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या.
 या खटल्यात फिर्यादी शिवदत्त धस यांच्यावतीने अॅड. अशोकराव रोडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. विशाखा रोडे यांनी सहाय्य केले.
Related Posts
1 of 2,326
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: