बंद घर फोडून तब्बल एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल लंपास

0
श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव शिवारातील जाधव कुटुंबातील सर्व नागरिक शेती करून आपली उपजीविका भागवतात दि18जुले रोजी फिर्यादी बन्सी जाधव वय-57 वर्षे धंदा-शेती रा. जाधव वस्ती,खांडगाव शिवार ता. श्रीगोंदा यांनी घर बंद करून मुलाच्या लग्नासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घर फोडून तब्बल एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One lakh and twenty thousand items were smashed in a closed house)
दि 18 जुले  रोजी फिर्यादीचे मुलगा सुभाष बाबा जाधव याचे साई बाबा आश्रम शिर्डी ता.राहाता येथे लग्न होते.दि 18जुले  रोजी सकाळी 07/30 वा चे सुमारास फिर्यादीचे मुलगा सुभाष बाबा जाधव याचे शिर्डी ता.राहाता येते लग्न असल्यामुळे घरातील सर्वजण घराला कुलूप लावून रघु बयाजी टकले यास राखनदार म्हणून ठेवून आम्ही लग्नासाठी गेले असता तेथील लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर फिर्यादीचे थोरला मुलगा विकास बाबा जाधव हा पुढे आमचे घरी खांडगाव येथे दुपारी 4/15 वा चे सुमारास आला असता आम्ही राखनदार ठेवलेला रघु टकले हा आमचे घराजवळील शेतामध्ये घास कापत होता त्यावेळी माझा मुलगा विकास यास आमचे घराचे दोन्ही खोल्यांचे कुलपे तुटलेले दिसले.
Related Posts
1 of 1,153
 त्यानंतर मुलगा विकास याने घरात जावून पाहिले असता घरातील सामानाची अस्ताव्यस्त झालेली होती त्यावेळी राखनदार रघू टकले याने मी दुपारी 3/00 वा चे सुमारास घास कापण्यासाठी गेलो होतो असे सांगितले त्यानंतर मुलगा विकास याने खात्री केली असता कपाटाचे दरवाजे उचकटुन आतील लॉकर उचकटलेले व अस्ताव्यस्त झालेले दिसले त्यामुळे मुलाने फोन करुन घरात चोरी झालेबाबत सांगितले त्यानंतर आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन करुन आमचे घरी चोरी झालेबाबत कळविल्याने पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी आमचे घरी भेट देवून पहाणी केली व आम्ही घरात जावून खात्री केली असता खालील वर्णनाचा व किंमतीचा माल चोरी गेला आहे.

नेहा धुपिया देणार लवकरच GOOD NEWS, सोशल मीडियावर दिली माहिती

 70,000/-रु.रोख रक्कम त्यात 500रु.दराच्या नोटा , 50,000/-रु.किं.चे सुन सौ.राधा विकास जाधव हिचे सोन्याचे दागिणे त्यात तोळे वजनाचे जु.वा.किं.अं. नेकलेस,सोन्याची पोत व पत्नी सौ.केशर हिचे कर्ण फुले,नथ असे एकुण दोन असा एकूण 1,20,000/-किंमतीचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे रहाते घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरफोडी चोरी करुन चोरून नेला आहे.असा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे तसेच अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास दिलीप तेजनकर करत आहेत. (One lakh and twenty thousand items were smashed in a closed house)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: