
नगर : येथील महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून एका व्यक्तीने अचानक उडी मारल्याने चांगलीच खळबळ उडाली. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेश ठमाजी राहिंज (रा. वांबोरी ता. राहुरी) असे जखमीचे नाव आहे. घटना समजताच मनपा कर्मचार्यांनी रूग्णवाहिका बोलावून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले.
राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो – राधाकृष्ण विखे पाटील
बुधवारी दुपारी सदर व्यक्ती महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आली होती. मात्र, कोणत्याही विभागाच्या कार्यालयात न जाता पहिल्या मजल्यावरील पॅसेजमध्ये घुटमळत होती. अचानक त्या व्यक्तीने संगणक विभागाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून खाली असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर उडी मारल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. सदर व्यक्तीने दारूच्या नशेत होता व तोल जाऊन तो खाली पडला असावा, असेही काहींनी सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने उडी मारली की तो पडला, यावरून संभ्रम आहे.