
नगरसेवक संतोष कोथिंबीरे यांच्या शेतात आज मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्याचा (leopard attack) हा थरार रंगला आज दि.१६ रोजी रात्री कोथिंबीरे यांचे बंधू अरविंद हे कॅनॉल ला पाणी सुटल्यामुळे त्यांच्या पेडगाव रस्त्यावरील शेतात गेले होते तिथे गेले असता गोठ्यातील गुरांची वेगळी हालचाल त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी लाईट लावली असता गोठ्या शेजारीच बिबट्या कालवड मारून ती खात असल्याचे दिसले त्यांनी सर्व लाईट लावत आजूबाजूच्या लोकांना फोन केले.
शहरापासून आगदी काही अंतरावर बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरार रंगल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने पाऊले उचलून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
नगरसेवक जखमी