खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

0 290
One commits suicide after being harassed by a private lender; Charges were filed against the three

प्रतिनिधी- DNA मराठी टीम

नाशिक –  नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा नाशिकमध्ये अशीच एकच धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. दिलीप दयाराम रौंदळ असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा नाव आहे.

दिलीप रौंदळ यांची मुलगी प्रणाली दिलीप रौंदळ यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अरुण बोधले, विजय लहामगे, चंदेश लोढया  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप रौंदळ यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशासाठी संशयितांनी तगादा लावला होता. त्यांनी रौंदळ यांचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळे त्यांनी कंटाळून मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट, औरंगाबाद रोडे येथे विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजून एकाही संशयिताला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे मृतांचे नातेवाईकांमध्ये असंतोष आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून नीलेश बाळासाहेब सोनवणे या 30 वर्षीय तरुणानेही आत्महत्या केली होती. सातपूर अशोकनगर भागातील नीलेश सोनवणेला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता. मात्र, सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित भावलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

Related Posts
1 of 2,326

कायदा काय सांगतो?

बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: