अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी औरंगाबाद येथून एकास अटक

0 279
अहमदनगर –  श्रीरामपूर शहरातील चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला शनिवारी रात्री औरंगाबाद येथून अटक केली असून तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(One arrested from Aurangabad in suicide case of minor girl)
 चितळी परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुलीची आईने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादित म्हटले आहे, आकाश खरात हा आपल्या शेजारी रहायला आहे. त्याचे आपल्या घरी जाणे येणे आहे.
Related Posts
1 of 1,608
आपली मुलगी दररोज रात्री आई वडिलांच्या घरी झोपायला जात होती. दि. १८ ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे मामाकडे झोपायला जाते, असे सांगून गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे कामावर निघून .गेलो. घरी आल्यावर मुलगी घरी आली नसल्याने आई वडिलांच्या घरी चौकशी केली. ती आपल्याकडे आलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह फास घेतलेल्या अवस्थेत आकाश खरात याच्या घरात आढळून आला. त्याचवेळी आकाश फरार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.(One arrested from Aurangabad in suicide case of minor girl)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: