DNA मराठी

जिल्ह्यात दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 287
Will Gutkha become political in Shrigonda? Many discussions abound

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर – अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत श्रीरामपुर तालुक्यातील सूतगिरणी फाट्यावर दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त केला आहे . या कारवाईनंतर तीन आरोपी फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , महाराष्ट्र राज्यात तंबाखुजन्य पदार्थाचे विक्री व साठवण करण्यास प्रतिबंध असतांना ही इसम मोईज पठाण व मुनिर पठाण (रा . सुत गिरणी फाटा , दुर्गानगर , श्रीरामपुर) हे त्याचे राहते घरात , महाराष्ट्र राज्यात विक्रीस व साठवणीस प्रतीबंदीत केलेला असतानाही चोरुन विनापरवाना बेकायदा विक्री व साठवण करत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे , मनोहर सिताराम गोसावी,  दत्तात्रय विठठल गव्हाणे , पोना/ शंकर संपतराव चौधरी ,पोकॉ / रणजीत पोपट जाधव , पोकॉ / रोहीत अंबादास येमुल , पोकॉ / सागर अशोक ससाणे,पोकॉ/ लक्ष्मण चिंधु खोकले यांच्या पथकाने  श्रीरामपुर शहर पोस्टे येथे जावुन  तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग अहमदनगर येथील राजेश नामदेव बडे यांना बातमीतील हकीगत कळविली  .

त्यानंतर  बातमीतील नमुद ठिकाणी जावुन  ठिक १६/०० वा  छापा टाकला  असता सुत गिरणी फाटा , दुर्गानगर , श्रीरामपुर येथे एक इसम त्याचे घरामध्ये हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा तसेच रॉयल ७१७ नाव असलेले तंबाखुचे पांढ – या रंगाच्या गोण्यामध्ये मिळून आल्याने सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मोईज मुनिर पठाण  असे असल्याचे सांगितले .

Related Posts
1 of 2,448

तसेच गुटखा व तंबाखु ही कोण विक्री करतो याबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की , सदर पान मसाला गुटखा हा मुनिर अब्बास पठाण हे शाहरुख मजीदखान पठाण (रा अशोकनगर ता श्रीरामपुर) येथुन घेउन येतात व हे दोघे गुटखा साठवण करून विक्री करतो.

सदर ठिकाणी १,२०,००० / – रु किमतीच्या पांढरे रंगाच े १० गोण्यामध्ये एकुण १००० हिरा पान मसाला गुटखा कंपनीचे पुडे प्रत्येकी किंमत १२० रू पुढे प्रमाणे तसेच ३०,००० / – रु किमतचे निळया रंगाचे १० गोण्यामध्ये एकुण १००० रॉयल ७१७ तंबाखुचे पुडे प्रत्येकी किंमत ३० रु पुडे प्रमाणे १,५०,००० रु किमतीची हीरा कंपनीचा पानमसाला गुटखा , तंबाखू , मोईज याचे कब्जात मिळुन आल्याने तो  जप्त मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत पुढील कारवाई कामी मा . सहा . आयुक्त , अन्न व औषध प्रशासन , अहमदनगर यांना कळवून आरोपी व मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: