कारागृहात 5 ते 6 आरोपीकडून एका आरोपीला जबर मारहाण

0 384

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या आवारातील दुय्यम कारागृहातील कैद्यांच्यामध्ये भांडण होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला आदिवासी समाज्याच्या पाच ते सहा आरोपींनी एकी करून बेदम मारहाण केली असून या भांडणात शरद भदे याला जबर दुखापत झाली आहे. त्याला ग्रामीण उपचाराकरिता दाखल केले असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भैलूमे यांनी स्टेशन डायरीला नोंद केली आहे.

या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या दुय्यम कारागृहाची क्षमता 40 असून याठिकाणी न्यायालयीन तसेच पोलिस कोठडी सुनावलेले सुमारे 80 कैदी असून या कैद्यांना पुरेशी जागा नसल्याने त्यांच्यात वेळोवेळी तक्रारी होत असतात त्यातच आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला आदिवासी समाज्याच्या पाच ते सहा आरोपींनी एकी करून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला देखील दुखापत झाली असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भैलूमे यांनी स्टेशन डायरीला नोंद केली आहे.

जिल्ह्यात संगमनेर पुन्हा टॉपवर , जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

Related Posts
1 of 1,487

आज झालेल्या हाणामारीत आरोपी शरद भदे याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी जेलर यांना कळवून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष करत वरिष्ठांना याची कोणतीही माहिती न देता भदे याला सुमारे दोन तासांनी दवाखान्यात हा उपचाराकरिता दाखल केल्याने जेलर यांच्या कारभारावर शंका उत्पन्न केली जात आहे.

हे पण पहा  –औरंगाबाद : पावसाच्या पाण्यात दुकानं गेली वाहून…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: