KKR vs MI सामन्यात सट्टा लावताना एक आरोपीस अटक; कोतवाली पोलिसांची कारवाई

0 156

प्रतिनिधी- DNA मराठी टीम

अहमदनगर- कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे हे पोलीस स्टेशन मध्ये रामनवमीनिमित्त बंदोबस्ताचे नियोजन करत असताना त्यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम हा आयपीएल क्रिकेट करीता मोबाईल फोन व्दारे हारजित करणे कामी लोकांनकडुन पैसे घेवून त्याना त्यांचे व्हाटसप मोबाईल फोन वर आयडी व पासवर्ड देत आहे व सद्या राजलक्ष्मी स्टेशनर्स स्टोअर जवळ जुना कापड बाजार रोड लगत पिरशहा खुंट अ नगर येथे चहाच्या टपरी जवळ बसुन हारजितीचा जुगार खेळवीतो आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाली

कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी लगेच पथक तयार करून पोलीस नाईक गणेश धोत्रे, पोलीस नाईक सलीम शेख, पोलीस कॉस्टेबल अतुल काजळे,पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहोकले,पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम,पोलीस नाईक संतोष गोमसाळे,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत या पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी छापा टाकला असता तेथे एक इसम चहाच्या टपरी जवळ वसुन बातमी प्रमाणे मोबाईल मध्ये काहीतरी करताना दिसला असता व त्यास जागीच पकडून व मोबाईल ची पाहणी केली असता त्याचे मोबाईल मध्ये व्हाटसप वर काही मोबाईल क्रं वरुन पैसे फोन पे ने पैसे घेतल्याचे तसेच त्यांना त्यांचे मोबाईल फोन वर पासवर्ड आकडे पाठवल्याचे दिसुन आले.

Related Posts
1 of 2,107

पथकाने त्याच्याकडून १५,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करत कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे ,पोलीस नाईक गणेश धोत्रे, पोलीस नाईक सलीम शेख, पोलीस कॉस्टेबल अतुल काजळे,पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहोकले,पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम,पोलीस नाईक संतोष गोमसाळे,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे हे करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: