सोसायटी निवडणुकांच्या निमित्ताने गावोगावी राजकारणाचा रंगला फड

0 281
The election of the society started in earnest and many people were shocked

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

श्रीगोंदा  –  मढेवडगांव सेवा सोसायटी निवडणुकीचा (society elections) कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून,विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे ऐन उष्णतेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात विकास सेवा सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, एकूण १० विकास सेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अजूनही काही सोसायट्यांची निवडणूक आगामी काळात लागण्याची शक्यता आहे.

Related Posts
1 of 2,459
मढेवडगाव सेवा सोसायटीची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून, त्यामुळे जुने प्रलंबित वादामुळे संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटणार असल्याचे सभासदांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे व अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे आहे. मागील पाच वर्षाचा कारभार पाहता सचिव निलंबित होणे, चार संचालक अपात्र होणे, कर्जवाटपात भेदभाव करणे त्यामुळे तालुक्यातील इतर सेवा सोसायटी प्रमाणे मढेवडगांव सेवा सोसायटी बिनविरोध होण्याची शाश्वती वाटत नाही.अपात्र संचालक व अपात्र सभासद या होणाऱ्या सेवा सोसायटी निवडणुकीचा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
गावची यात्रा व सेवा सोसायटीची निवडणूक एकाच टप्प्यात येत असल्यामुळे संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.सेवा सोसायटीचे निवडणुकीच्या निमित्ताने गावात कार्यकर्त्यांच्या घोंगडी बैठका चालू आहेत.गावचे नेते पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे हे पूर्ण ताकतिनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सभासद वर्गातून चर्चिले जात आहे.
 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विकास सेवा सोसायटी संचालकांच्या ठरावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा बँकेच्या मागील काही निवडणुकांसाठी झालेला घोडेबाजार व साठमारी बघता सोसायटी संचालक होण्याची अनेकांची सुप्त इच्छा आहे. नेतेमंडळींनी सुद्धा सोसायटीवर आपल्या विचारांचे लोक निवडून यावेत, यासाठी रसद पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निमित्ताने गावोगावी राजकारणाचा फड रंगला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: