
श्रीगोंदा – राजेंद्र दादा नागवडे (Rajendra Nagwade) चेअरमन सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा यांच्या 14 मे 2022 रोजी होणा-या वाढदिवसाचे औचित्य साधत, राजेंद्र दादा नागवडे मित्र परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बुधवार दिनांक 18 मे 2022 रोजी सायंकाळी 6 ते 9:30 च्या दरम्यान टीव्ही फेम सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे व सिने अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा लोकप्रिय “चला-हवा-येऊ-द्या” हा हास्यविनोद आणि लाइव्ह डान्स शो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे मैदान, श्रीगोंदा येथे नमूद कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत आज दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तसेच आदेश शेठ नागवडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला थिंक ब्रॅण्डेड प्रमोशन च्या सहप्रवर्तिका यशा पाळकर यांनी संबोधित केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमांमध्ये येणारे कलाकार, कार्यक्रमाचा कालावधी, कार्यक्रमांमध्ये श्रोत्यांच्या उपस्थिती.. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संभाव्य स्थिती लक्षात घेत, कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पालन करण्यात येईल, असे यावेळी नियोजनात सांगितले.थिंक ब्रॅण्डेड प्रमोशन चे मुख्य प्रवर्तक अवधूत राऊत व आदेश नागवडे मित्र परिवार तसेच राजेंद्र दादा नागवडे मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.18 मे 2022 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अनुराधाताई नागवडे (संचालिका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगर) या असणार असून, या कार्यक्रमाचे संयोजक दीपक नागवडे, पृथ्वीराज नागवडे, आदेश नागवडे असणार आहेत.