तर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन – प्रताप सरनाईक

0 253

मुंबई –  राज्य सरकारने शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap sarnaik) यांच्यावर ठाणे महापालिकेने लावलेल्या दंड आणि त्यावरील व्याजला वित्त विभागाच्या विरोध बाजूला ठेवून माफ करण्याचा निर्णय घेतल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनले आहे. 

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने (BJP) विरोध केला आहे. तर यानंतर पत्रकार परिषद घेत प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांच्यावर गंभीर आरोप केले.

अन् ब्रेकअपची चर्चा ऐकून भडकली मलायका अरोरा, म्हणाली….

सुडबुद्धीने त्यांनी ही ‘छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरवलं आरोप यावेळी त्यांनी केला. तांत्रिक बाजू ग्राह्य धरुन जाता जाता त्यांनी या इमारतीची जी मंजूर फाईल होती त्यावर ताशेरे ओढले असं ते म्हणाले. तसंच एक इंचही बांधकाम अनधिकृत ठरलं तर आमदारकीचा राजीनामा देईन असंही म्हटलं आहे.

Related Posts
1 of 1,635

प्रताप सरनाईक मराठी आहे. माझी विहान कंस्ट्रक्शन कंपनी १९८९ सालची आहे. ९७ मध्ये नगरसेवक आणि २००९ मध्ये आमदार झालो. आधी एक व्यावसायिक म्हणून उदयास आलो आणि नंतर राजकारणात आलो. फक्त मराठी प्रताप सरनाईक दिसतो, पण हिरानंदानी, लोढा यांचं नाव का घेतलं नाही? त्यांना का दंड आकारला नाही? महापालिकेला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर विकासक म्हणून मला इतकं नुकसान होत असेल तर भविष्यात कोणीही विकास करण्यासाठी पुढे सरसावणार नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

यावेळी त्यांनी विहंग गार्डन इमारतीत एक इंच जरी अनधिकृत बांधकाम असेल तर प्रताप सरनाईक दुसऱ्या दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल असं असे देखील सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: