लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरीने केला ‘तो’ काम; नवरदेवाला बसला धक्का अन्..

समोर आलेल्या माहितीनुसार लग्नानंतर अवघ्या 10 तासांनी नववधू सासरच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी असा धक्कादायक प्रकार समोर आला. हे प्रकरण शहागंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका चांदीच्या कारागिरासोबत घडलं आहे, जो नवरीच्या शोधात होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ताजगंज येथे राहणाऱ्या एका कारखान्यातील कर्मचाऱ्याने सांगितलं की, तोही आपल्या वहिणीसाठी नवरदेव (groom) शोधत आहे. दोन्हीकडील लोकांची भेट झाली आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. दरम्यान, नवरीच्या दिराने सांगितलं की, मुलीचं कुटुंब गरीब आहे, त्यामुळे ते लग्नाचा खर्च उचलू शकणार नाहीत. यानंतर लग्नाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी नवरदेवाकडच्यांनी घेतली. 25 एप्रिल रोजी वरात आग्राहून गोरखपूरला पोहोचली आणि दोघांनीही रितीरिवाजानुसार लग्न केलं. 26 एप्रिल रोजी सकाळी वधू आग्रा येथे पोहोचली.
26 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवरी शांतपणे उठली आणि घराच्या अंगणातील भिंतीवर चढून फरार झाली. पळून जाण्यापूर्वी तिने सासूच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले. वधू फरार झाल्याचं नातेवाइकांना समजताच सगळ्यांना धक्का बसला. दरम्यान, रात्री उशिरा कॉलनीतील चौकीदाराने नवरीला बाहेर जाताना पाहिले असता त्याला संशय आला आणि त्याने गेट उघडण्यास नकार दिला. त्याने नवरीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चिने चौकीदाराला धमकावून पळ काढला.
नवरदेव आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य रात्रभर नवरीचा शोध घेत राहिले, परंतु काही उपयोग झाला नाही. यामुळे हताश झालेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण गाठून तक्रार दाखल केली. पोलिस आता कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.