दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या

0 196

बीड –   संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Due to heavy rains) अनेक शेतकऱ्यांचे (farmers)  नुकसान झाले आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातमध्ये शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.  पावसात अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.(On the event of Diwali, a farmer committed suicide by hanging himself)

मात्र मराठवाडा विभागात हा प्रकार थांबला नसून ते अद्याप सुरूच आहे. बीड जिल्हयातील एका अल्पभूधारक ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपावली या सणाला अवघ्या काही दिवस शिल्लक असताना  आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संदिपान रामा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर दीड एकर शेती होती. पण एवढ्या शेतीवर संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न त्यांना सतावत होता. अशात अस्मानी संकाटामुळे अनेकदा हातातोंडाला आलेला घास हिरावला होता. त्यामुळे ते ऊसतोडणी कामगार म्हणून देखील काम करत होते. मृत चव्हाण यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. यातील एका मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला होता.

बाप रे ! येणाऱ्या काळात पेट्रोल 150 तर डीझेल 140 रुपये प्रति लिटर होणार ?

पण दुसऱ्या मुलीचा विवाह कसा करायचा? याची चिंता त्यांना सतावत होती. यातूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आलं होतं. दरम्यान गुरुवारी रात्री चव्हाण यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवण केलं आणि ते घराबाहेर पडले. यानंतर त्यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.  या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. (On the event of Diwali, a farmer committed suicide by hanging himself)

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: