प्रेमात धोका मिळाल्यानं साखरपुड्याच्या दिवशी प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

0 400

प्रतापगड –    उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरैनी गावात प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरोपी महिलेनं प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार मैरनी गावातील रहिवासी असणाऱ्या राजेंद्र वर्मा याचं मागील काही दिवसांपासून रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी मृत राजेंद्र याचं लग्न ठरलं होतं. 31 ऑगस्ट रोजी साखरपुडाही होणार होता. पण आपल्या प्रियकराचं लग्न होतंय, यामुळे प्रेयसी सोना देवी राजेंद्रवर दु:खी झाली होती. प्रेमात धोका मिळाल्यानं आरोपी प्रेयसी सोना देवीनं आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.

आरोपींनी 29 ऑगस्ट रोजी राजेंद्र याला लखनऊ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवलं होतं. सोना देवीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन मित्र या गाडीत आधीपासूनच बसले होते. गाडीत बसून काही अंतर जाईपर्यंत सर्व काही ठिक होतं. आपली हत्या होणार आहे, याचा जराही सुगावा राजेंद्रला लागला नव्हता. पण काही अंतर दूर गेल्यानंतर प्रेयसी सोना देवी, तिचा भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रची गळा चिरून हत्या केली.

बंद करून दाखवले याचे श्रेय घेणार का? नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

त्यानंतर आरोपींनी एका नाल्यात राजेंद्रचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्र याचा मृतदेह नाल्यात आढळला. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी मुख्य सुत्रधार आरोपी प्रेयसी सोना देवीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: