भाऊबीजेच्या दिवशी भावाची 5 ते 6 वार करत निर्घृण हत्या……, आरोपी फरार

0 407

 मनमाड –   राज्यातील व्यस्त रेल्वे स्थानकापैकी एक असलेला  मनमाड रेल्वे  स्थानका (Manmad railway station) वर आज पहाटे  चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही हत्या सर्व प्रवाशांसमोर  करण्यात आली आहे.  हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार (Shivam Pawar) असे आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (On the day of bhaubija, brother was brutally killed 5 to 6 times ……, accused absconded)

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस (Nandigram Express) उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने 5 ते 6 वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले.

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक 

प्रेम प्रकरणातून ही हत्त्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्त्या करण्यात आली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती. संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चौकशीनंतर या हत्याकांडामागचे नेमकं कारण काय याचा उलगडा होईल. शिवमला 3 बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी भावाची हत्या झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करीत आहे. (On the day of bhaubija, brother was brutally killed 5 to 6 times ……, accused absconded)

Weather Alert , राज्यभरात मुसळधार पाऊसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: