साई क्रिकेट क्लबच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष स्व. कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ क्रिकेट प्रीमिअर लीग

0 121
अहमदनगर –   साई क्रिकेट क्लबच्या (Sai Cricket Club) वतीने माजी उपनगराध्यक्ष स्व. कृष्णाभाऊ जाधव (Krishnabhau Jadhav) यांच्या स्मरणार्थ क्रिकेट प्रीमिअर लीग (Cricket Premier League) चे २४ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ६ ते ९ या वेळेत न्यू आर्ट्स कॉलेज मैदान,लालटाकी येथे आयोजन करण्यात आले आहे.(On behalf of Sai Cricket Club, former Vice President late. Cricket Premier League in memory of Krishnabhau Jadhav)
शहरातील विविध क्रिकेट क्लब मधील खेळाडूंची बोली लावून खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे .स्पर्धेत १० संघ सामने खेळणार असून त्याची संपूर्ण रचना आयपीएल स्पर्धेसारखी करण्यात आली आहे.स्पर्धेदरम्यान एकूण ४८ सामने खेळविले जाणार आहे.तसेच स्पर्धेदरम्यान रणजीपटु आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,खा.सुजयदादा विखे पा.,आ.संग्रामभैय्या जगताप,ॲड.अभय आगरकर,दिपजी चव्हाण,ब्रिजलाल सारडा,वसंतशेठ लोढा,सुरेश तिवारी,डॉ.पारस कोठारी,राजुमामा जाधव हे  उपस्थित राहणार आहेत.
Related Posts
1 of 58
आरोग्य व शरीर तंदरुस्त टिकवण्यासाठी व शहरातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे साईद्वारका सेवा ट्रस्ट चे अँड.धनंजय जाधव यांनी  सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी साई क्रिकेट क्लबचे राकेश गवते, गणेश गायकवाड, राज कोंडके, सुमित साळी, किरण भंडारी आदी विशेष परिश्रम घेत आहेत.तसेच नगरकर क्रिकेट प्रेमींनी या प्रिमिअर लिगचा आनंद घ्यावा असे आवाहन साई क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले.(On behalf of Sai Cricket Club, former Vice President late. Cricket Premier League in memory of Krishnabhau Jadhav0
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: