ओम्नी आणि टोयोटा अर्बन क्रुझर या वाहनांची ओहोरटेक करताना सामोरा समोर धडक; दोन्ही चालक जखमी

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- नगर – दौंड महामार्गावरील घारगाव (Ghargaon)शिवारात हॉटेल निलगिरी समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती ओम्नी आणि टोयोटा अर्बन क्रुझर या चारचाकी वाहनांची ओहोरटेक करताना सामोरा समोर झालेल्या धडकेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून अपघाताची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक नंदकुमार पठारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ उपचार करिता अहमदनगर येथील रुग्णालयात हलवत रस्त्यावर असलेली अपघात ग्रस्त वाहने हटउन मार्ग मोकळा केला.
Related Posts
या बाबत सविस्तर असे की नगर दौंड रस्त्यावर घारगाव शिवारातील निलगिरी हॉटेल समोर श्रीगोंद्याकडून नगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती ओम्नी क्र. एम.एच.१२ एन.८७७१ आणि दौंड कडून नगर कडे जाणारी टोयोटा अर्बन क्रुझर क्र. एम. एच.११ डी. ए.९३९७ या दोन चारचाकी गाड्यांची ओहोरटेक करताना सामोरा समोर भिषणधडक होऊन यात ओम्नी गाडीचा चालक अकील शेख ३० रा.श्रीगोंदा आणि गाडीतील त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले. तर अर्बन क्रुझर मधील प्रवासी देखील गंभीर जखमी झाले मात्र त्यांचे नाव कळू शकले नाही.
झालेली धडक खुप भीषण झाली की अर्बन क्रुझरचे पुढील चाक शॉक अपसह गळून गेले होते.घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नंदकुमार पठारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ उपचार करिता अहमदनगर येथील रुग्णालयात हलवत रस्त्यावर असलेली अपघात ग्रस्त वाहने हटउन मार्ग मोकळा करत अपघाताचा पंचनामा केला.पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.