DNA मराठी

टेम्पोच्या धडकेत वृद्ध ठार

आयशर टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला.

0 8

Ahmednagar accident :-  आयशर टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. अहमदनगर – पुणे महामार्गावर कामरगाव (ता.नगर) गावचे शिवारात असलेल्या अभिजित मंगल कार्यालया समोर बुधवारी (ता.१०) दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

शरद पवार राजकारणात सक्रीय राहणे गरजेचे….
अशोक खंडू सोनवणे (वय ५९, रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि.पुणे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सोनवणे हे बुधवारी (ता.१०) दुपारी साडे बाराच्या सुमारास कामरगाव (ता.नगर) गावच्या शिवारात असलेल्या अभिजित मंगल कार्यालया समोर रस्ता ओलांडत असताना जावेद अहमद पठाण (रा.रहीमपूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांने त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचा आयशर टेम्पो (एम.एच.२० सीटी ७१२३) भरधाव वेगात चालवत सोनवणे यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, सोनवणे हे रस्त्यावर लांब फेकले गेले. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत झाले.

अपेक्षा कमी ठेवल्यास विवाह लवकर जमतील….

Related Posts
1 of 2,494

याबाबत मृत सोनवणे यांचा मुलगा सचिन अशोक सोनवणे (वय-३६) यांनी गुरुवारी (ता.११) नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक जावेद पठाण याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: