अरे वा .. एकाच वेळी सून, सासरे, आणि दीर बारावी परीक्षेत पास

0 285
Oh wow .. daughter-in-law, father-in-law, and Deer passed the 12th exam at the same time

 

नाशिक –   नुकताच राज्यात  बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला असून यावेळी देखील या निकाल मध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी ९४ टक्के पेक्षा जास्त मुले आणि मुली बारावीच्या परीक्षेत पास झाले आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच कौतुक होत आहे. ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत कोणाला ९८ तर कोणाला ३५ टक्के मिळाले आहे. मात्र संपूर्ण राज्यात नाशिक जिल्ह्यातील एका निकालाची चर्चा जोराने होत आहे.

 

नाशिकमधील त्रंबकेश्वर तालुक्यात राहणारे देहाडे कुटूंबातील सून ऋतिका तिचे सासरे लक्ष्मण आणि दीर समीर या तिघांनीही बारावीची परीक्षा सोबत दिली होती. आता त्यांचा निकाल जाहीर झाला असून सून ऋतिका हिला ५० टक्के, सासरे लक्ष्मण यांना ६४.५० टक्के आणि दीर समीर याला ६४ टक्के गुण मिळाले आहेत.या निकालाने देहाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तर सर्वत्र या कुटुंबाच कौतुक केल जात आहे.

 

Related Posts
1 of 2,321

देहाडे कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आवटे येथे राहतात. या कुटुंबात एकूण पाच जण आहेत. कुटुंब प्रमुख लक्ष्मजण देहाडे हे दहावी पास आहेत. तर त्यांचा एक मुलगा Bsc ला आहे. तर एक मुलगा बारावीला आहे. त्यांच्या मोठ्या मुलाच काही महिन्यापूर्वी लग्न झाल आहे. त्यांची सून हि दहावी शिकली होती. मात्र सुनेने सुद्धा आपल्या मुलांप्रमाणे उच्च शिक्षण घ्याव अशी कुटुंबाची इच्छा होती. याबरोबर लक्ष्मण यांना सुद्धा अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: