अरे देवा! आरोग्य विभागाच्या परीक्षेआधीच गोंधळ

0 14

नवी मुंबई –  बहुचर्चित आरोग्य विभागाच्या २८ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज भरण्याच्या वेळी २ ते ३ पदांसाठी शुल्कासह अर्ज स्वीकारण्यात आले होते.

आता या तीनही पदांची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने परीक्षार्थींना कुठलीही एकच परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासाठी दिलेला प्राधान्यक्रम बदलून पुण्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर, गडचिरोली, तर नागपूरच्या उमेदवारास पुणे, ठाणे असे परीक्षा केंद्र दिल्याने परीक्षा नियोजन करणाऱ्या खासगी कंपनीने परीक्षेआधीच गोंधळ घातला आहे.

अर्ज करताना उमेदवारांना एकाच पदासाठी एकच अर्ज करता येईल, अशी कुठलीही अट घालण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी पात्र असणाऱ्या दोन ते तीन पदांसाठी अर्ज केले. यासाठी मागास वर्गाला ३००, तर सामान्य वर्गाला ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते.

Related Posts
1 of 1,301

महाआयटीने २८ फेब्रुवारीच्या परीक्षांचे प्रवेश पत्र रविवारी उमेदवारांना देताच परीक्षा नियोजनातील गोंधळ समोर आला. या सर्व परीक्षा राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुका केंद्रांवर एकाच दिवशी होणार असल्याने तीन अर्जांचा स्वीकार करूनही उमेदवारांना एकच परीक्षा देता येणार आहे.

आरोग्य विभागात १७ हजार जागा रिक्त असून त्यातील ५० टक्के म्हणजे साडेआठ हजार जागांसाठी २८ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शासनाच्या ‘महाआयटी’ कंपनीने नेमलेल्या खासगी कंपन्यांकडून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. आरोग्य विभागातील मानसशास्त्रज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, कनिष्ठ लिपिक, सामाजिक पर्यवेक्षक अशा विविध पदांसाठी २०१९ला महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज भरण्यात आले होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: