राज्यातील आता ही मध्यवर्ती बँक आली ईडीच्या रडारवर…..

0 202
अमरावती –  ईडीच्या रडारवर आता राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक आली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Amravati District Central Co-operative Bank) बँकेत आर्थिक अनियमितता दिसल्याने ईडीने बँकेला नोटीस बजावली आहे. (Now this central bank in the state is on the radar of ED …..)
 या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता दिसून आली आहे. यानंतर सक्तवसुली संचालनाच्या अर्थात ईडीच्या रडारवर बँक आली आहे. ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागितली असून जिल्हा उपनिबंधकांना ईडीने पत्र पाठवत विनाविलंब मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल पाठविण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे.
Related Posts
1 of 1,481

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Now this central bank in the state is on the radar of ED …..)

उद्या मोहरमचा दहावा दिवस, जाणून घ्या मोहरम बद्दल संपूर्ण माहिती

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: