आता कप्पा व्हेरिएंटचा देशात प्रसार , “या” राज्यात सापडले ११ रुग्ण

0

नवी दिल्ली –   एकीकडे देशात कोरोना विषाणूच्या (Corona virus)  दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना दिसत असला तरी दररोज ३० ते ४५   हजार दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे . सर्वांमध्येच परत एकदा  चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

देशात सध्या कोरोना विषाणूचा म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. देशात आतापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकरणाचा प्रसार झाला आहे.  यामध्ये आणखी एक नाव जोडला गेला आहे ते म्हणजे  कप्पा व्हेरिएंटचा (Kappa variant) .  राजस्थानमध्ये  कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. याआधी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

करोना विषाणूच्या कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या ११ रुग्णांपैकी चार जण अलवर आणि जयपूरचे, दोन बाडमेर आणि एक भिलवारा येथील आहेत. जनुकीय सर्वेक्षणनंतर या प्रकरणांची माहिती मिळाली, असे डॉ. रघु शर्मा म्हणाले. डेल्टा प्रकारापेक्षा कप्पा व्हेरिएंट कमी प्राणघातक आहे असे वैद्यकीय मंत्री म्हणाले. मंगळवारी राजस्थानमध्ये २८ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१३ उपचाराधीन रूग्ण आहेत.या पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये कप्पाच्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

राहुल गांधी- प्रशांत किशोर यांची भेट, “या” विषयावर झाली महत्त्वाची चर्चा

Related Posts
1 of 1,156

दरम्यान, याआधी देखील उत्तर प्रदेशमध्ये कप्पा विषाणूचे रुग्ण सापडल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली होती. “याआधी देखील कप्पा व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आले होते. हा व्हायरल अद्याप चिंतेचं कारण नाही. हा करोना विषाणूचा व्हेरिएंट आहे आणि त्यावर उपचार करणं शक्य आहे”, असं प्रसाद यांनी सांगितलं होतं. मात्र, कप्पा व्हेरिएंटचे हे रुग्ण नेमके राज्याच्या कोणत्या भागात सापडले, याची माहिती मात्र त्यांनी दिलेली नव्हती. दरम्यान, कप्पा विषाणूची रुग्णसंख्या अत्यल्प असली, तरी डेल्टा आणि अल्फाप्रमाणेच कप्पा विषाणू देखील वेगाने प्रसार होणारा असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेस स्वबळावर लढणार , उद्धव ठाकरेंनी लगावला टोला, म्हणाले…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: