राज ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेविरोधात आता मनसेला ‘इतक्या’ कार्यकर्त्यांने ठोकला रामराम

0 432
Hurricane Radha! Even before that meeting, MNS and Sonic clashed in the MNS office
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) राज्यातील मशिदींवर असणाऱ्या भोंग्यांना विरोधात भूमिका घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यानंतर महाविकास आघडी आणि मनसेमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहे.  तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मनसेला अडचणीची ठरताना दिसत आहे. या भूमिकेनंतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आता पर्यंत पक्षाला रामराम ठोकला आहे.
Related Posts
1 of 2,452

पुण्यात राजीनामा आणि नाराजी

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले. मात्र, राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यातील माझीद अमीन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष आहेत. अमीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयांवर भर दिला जात आहे, या कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

मुंबई-मराठवाड्यातील 35 कार्यकर्त्यांचे राजीनामे

मनसेने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील भूमिकेनंतर मुंबई आणि मराठवाड्यातील एकूण 35 कार्यकर्त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर एका मागे एक मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने याचा काहीसा फटका आगामी मनपा निवडणुकांत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: