भारीच आ ! आता ‘या’ ट्रिकचा वापर करून टाईप न करता WhatsAppवर पाठवा मेसेज

मुंबई – संपूर्ण जगासह देशात लोकप्रिय असणाऱ्या मेसजींग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp)होय. या व्हॉट्सअॅपचा वापर करून तुम्ही सहज कोणलाही मेसेज करू शकतात किंवा महत्वाचे दस्तऐवज पाठवू शकतात. मात्र कधी कधी या प्रक्रियामध्ये फार वेळ खर्च होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही टाइप न करता मेसेज पाठवू शकाल. ही ट्रिक युज करण्यासाठी गुगल असिस्टंटचा वापर तुम्ही करू शकतात.
अशी वापरा ट्रिक
तुमच्या Android स्मार्टफोनचे होम बटण दाबा आणि नंतर ‘Hey Google‘ म्हणा. अशा प्रकारे तुमचा गुगल असिस्टंट सक्रिय होईल. नंतर Send A Message to – (तुम्ही ज्या संपर्काला संदेश पाठवू इच्छिता त्याचे नाव) म्हणा. लक्षात ठेवा की तो संपर्क तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेला असणे आवश्यक आहे जेणेकरून व्हॉइस असिस्टंट तो ओळखू शकेल.
यानंतर तुम्हाला ज्या अॅपद्वारे मेसेज पाठवायचा आहे ते अॅप निवडा. व्हॉट्सअॅप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज पाठवायचा असेल तर तो गुगल असिस्टंटशी बोला. तुम्ही मेसेज बोलल्यानंतर, Google सहाय्यक तो एकदा रिपीट करेल. यानंतर तो तुम्हाला कन्फर्म करेल की तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे की नाही. आता तुम्ही ‘हो’ म्हणाल आणि अशा प्रकारे तुम्हाला तो टाईप न करता संदेश पाठवला जाईल.