आता फोटो एडिट करणं होणार सोपं, WhatsApp घेऊन येणार नवीन फीचर्स

0 305
Respond to messages without typing anything; WhatsApp brings abandonment feature

 मुंबई – जगात सर्वात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅप (Social media messaging app) व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) लवकरच आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर घेऊन येणार आहे. या नवीन फीचर्समध्ये यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप कॅमेरा सेटिंग्जमध्ये सुधारणा आणि व्हॉइसनोट बॅकग्राऊंडमध्ये प्ले करणे या सारख्या सुविधांचा समावेश करणार आहे. नव्या अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कंपनी ड्रॉईंग टूल देणार असून यात नवे पेन्सिल आयकॉन असेल.

याच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करण्याआधी त्यावर आपल्याला एडिटिंग करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीपासूनच पेन्सिल फीचर उपलब्ध आहे परंतु नवीन अपडेटनंतर वापरकर्त्यांना बारीक आणि जाड अशी पेन्सिल मिळेल ज्यामुळे ड्रॉईंगचा अनुभव बदलणार आहे. येणाऱ्या काळात ब्लर इमेज टूलसुद्धा मिळणार आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटा अँड्रॉइड २.२२.३.५ अपडेटमध्ये पाहिले गेले आहे, परंतु ते बाय डिफॉल्ट डिसेबल करण्यात आले आहे. हे फीचर अद्याप विकसित होत असून लवकरच बीटा परीक्षकांसमोर सादर केले जाईल.
Related Posts
1 of 2,119

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना नवीन चॅट बबल कलर मिळेल ज्यामुळे डार्क मोड वापरताना वापरकर्त्यांना नवीन गडद निळा रंग मिळेल. हे अपडेट विंडोज आणि मॅक ओएस अ‍ॅपसाठी येईल जे व्हॉट्सअ‍ॅप बीटा डेस्कटॉप २.२२०१.२.० मध्ये चॅट बबल हिरवे करेल. यामुळे चॅट बार आणि बॅकग्राऊंडचा रंग देखील बदलेल.

शेततळ्यामध्ये भाऊ बुडत असल्याचं पाहून बहिणीने घेतली शेततळ्यात उडी अन्…..

दुसऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस वापरकर्त्यांना नोटिफिकेशन सेटिंग्ज मॅनेज करण्याचा पर्याय देखील मिळेल, ज्यामुळे कोणत्या चॅट किंवा ग्रुप चॅटचे नोटिफिकेशन प्राप्त करायचे आहेत हे सेट करता येणार आहे. तसेच नोटिफिकेशन साऊंडदेखील मॅनेज करता येणार आहे. सोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज रिअ‍ॅक्शन टॅब देखील असेल, ज्यात वापरकर्ते कोणत्या मेसेजवर कोणी रिअ‍ॅक्ट केलं हे पाहू शकतील.  कंपनी या मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर ज्याप्रकारे वापरकर्ते ज्याप्रकारे हे फीचर वापरात आहेत तशाच पद्धतीने हे फीचर काम करेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: