10 गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड भरत एडकेला अखेर अटक

0 246
Notorious gangster Bharat Edke, who was absconding in 10 cases, was finally arrested
 अहमदनगर-  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) मोठी कारवाई करत मागच्या आठ वर्षांपासून विविध गुन्ह्यामध्ये फरार असणाऱ्या भरत विठ्ठल एडके (Bharat Vitthal Edke) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर पुणे येथील प्रसिध्द बिल्डर फैजल खान, बेलवंडी येथील आकाश मापारी याच्या हत्याचा आरोप आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यात जामखेड मध्ये घडलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका शिवसेना प्रमुख शंकर पाटील ठाणेकर हत्याचा आरोप आहे. (Notorious gangster Bharat Edke, who was absconding in 10 cases, was finally arrested )
भरत विठ्ठल एडके हा आरोपी  मोक्का गुन्ह्यासह वरील आरोपात मागच्या आठ वर्षापासून फरार होता. त्याला अखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे.  सप्टेंबर 2014 मध्ये जामखेड बीड रोडवरील मोहागाव शिवारात भालचंद्र नाईक यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मारहाण केली झाली यात त्यांचा मृत्यू झाला होता.
Related Posts
1 of 2,326
तर पुणे येथील सुप्रसिद्ध  बिल्डर फैजल खान यांचा 65 एकर जमिनीच्या वादामधून सुपारी घेवुन खून झाला होता. अहमदनगर मध्ये  ढवळगांव फाटा येथील आकाश मापारी यांचे अपहरण करून खून झाला होता या गुन्ह्यासह विविध पोलीस ठाण्यात मोक्का, खुन, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे एकूण 10 गुन्ह्यात भरत विठ्ठल एडके हा फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ठाण्यातून ताब्यात घेतला. ( Notorious gangster Bharat Edke, who was absconding in 10 cases, was finally arrested )
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: