मनसेच्या आंदोलनाची दखल, आनंदनगर, आगरकर मळा भागाला स्वच्छ पाणीपुरवठा

0 152

अहमदनगर –   शहराती आनंदनगर, आगरकर मळा भागाला अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे मनसे (MNS) चे नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी पालिकेचे आयुक्त शंकर गोरे (Shankar Gore) यांना निवेदन देऊन दूषित पाणीपुरवठा बंद करा अन्यथा त्याच दूषित पाण्याने आयुक्तांसह संबंधित पाणी पुरवठा विभागा (Water Supply Department)चे अधिकारी यांना आंघोळ घालण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. (Notice of MNS agitation, clean water supply to Anandnagar, Agarkar Mala area)

या आंदोलनाची महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी चांगलीच दखल घेत महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी अभियंता यांनी रात्रंदिवस काम करून सर्व लाईनची पाहणी करून दुरुस्ती करून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यास त्यांना यश आले आणि 24 नोव्हेंबर रोजी आनंदनगर, आगरकर मळा, स्टेशनपरिसर, कायनेटिकचौक या भागाला स्वच्छ पाणीपुरवठा झाला.

या भागातील टाकीमध्ये स्वच्छ पाणी जमा झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १५मधील आगरकर मळा, आनंदनगर भागाला दुसऱ्या दिवशी  स्वच्छ पाणीपुरवठा होणार यात शंका नाही मनसेच्या आंदोलनाला आलेल्या यशामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नितीन भुतारे यांचे धन्यवाद व्यक्त करून आभार मानले. आंदोलनाच्या आधीच घेतलेली महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी दखल घेतली त्यामुळे मनसेचे नितीन भुतारे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहे . रात्रंदिवस काम करणारे सहाय्यक अभियंता राहुल गीते यांनी सुद्धा या कामासाठी मोठे परिश्रम घेतले त्यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांनी सुद्धा परिश्रम घेतल्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून भागातील नागरिकांच्या वतीने आभार मानले . त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाला स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व नितीन भुतारे यांनी घेतलेल्या या विषयाची दखल त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पाण्याची तपासणी पाणीपुरवठा प्रमुख अभियंता रोहीदास सातपुते, राहूल गीते यांनी पाणी स्वच्छ असल्याचे मनसेचे नितीनभुतारे यांच्या निदर्शनास आणून दिले. व हे पाणी लॅब टेस्टिंग साठी पाठविण्याचे आदेश दिले रोहीदास सातपुते यांनी राहुल गीते यांना दिले स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचे गजानन कॉलनी येथील संपवेल  पाण्याच्या टाकी मध्ये नव्याने आलेले पाणी पाणीपुरवठ्यातून दिसून आले  यावेळी या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड मनसेचे संतोष साळवे गणेश औसारकर उगले, शेळके आदी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.

Related Posts
1 of 1,487

स्मृती इराणींना कपिल शर्माच्या सेटवर नो एंट्री ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

या पुढे या भागला दुषित पाणी पुरवठा होणार नाही. याची काळजी घ्या अशी विनंती मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगर पालिका पाणीपुरवठा प्रमुख अभियंता रोहीदास सातपुते यांना केली अन्यथा आम्हाला या पुढेही आंदोलनं करावे लागेल असे नितीन भुतारे यांनी सांगितले.(Notice of MNS agitation, clean water supply to Anandnagar, Agarkar Mala area)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: