निमगाव वाघात स्वातंत्र्य दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0 127

अहमदनगर –  निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिवस (Independence Day ) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात साध्या पध्दतीने नियमांचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला.

गावातील नवनाथ विद्यालयात भारतीय हवाई दलातील जवान समीर शेख, ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अलका गायकवाड तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच रुपाली जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने गावातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करुन वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी लायन्स च्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, पी.एन. डफळ, प्रभाकर सुरकुटला, छाया राजपूत, प्रसाद मांढरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, पूजा चव्हाण, सुरेखा भोसले, संदीपसिंह चव्हाण, शारदा पवार, श्रेयस सावंत, नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, कोंडीभाऊ फलके, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख, गोकुळ जाधव, काशीनाथ पळसकर, अण्णा जाधव, निळकंठ वाघमारे, अतुल फलके, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, किरण जाधव, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, संदिप डोंगरे, सुवर्णा जाधव, प्रतिभा डोंगरे, अनिल डोंगरे, अरुण कापसे, शंकर गायकवाड, मयुर काळे, रंगनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

लायन्सचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी वंचित घटकातील आधार देण्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील आहे. दुर्लक्षित घटकांना प्रवाहात आनण्याचे काम लायन्स करीत असून, ही सामाजिक चळवळ तळागाळा पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. संपुर्णा सावंत यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी लायन्स शिक्षणदूतची भुमिका बजावत असल्याचे सांगून, लायन्स क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना व शाळेसाठी शैक्षणिक मदत करण्यासह आरोग्य शिबीर, कर्करोग तपासणी, कोरोना लसीकरण व महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर पर्यावरण चळवळीला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरणाचे समतोल बिघडल्याने अनेक नैसर्गिक संकट ओढवली जात असून, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वातंत्र्यानंतर घटनेने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून, यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधून वृक्षारोपणाचे महत्त्व व पर्यावरण चळवळीबद्दलची माहिती दिली. आभार साहेबराव बोडखे यांनी मानले.

निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने गावातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स च्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, पी.एन. डफळ, प्रभाकर सुरकुटला, छाया राजपूत, प्रसाद मांढरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, कोंडीभाऊ फलके, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख आदी.

निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नवनाथ विद्यालयात भारतीय हवाई दलातील जवान समीर शेख यांनी ध्वजारोहण केले तर निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच रुपाली जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Related Posts
1 of 1,608
निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी लायन्स च्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, पी.एन. डफळ, प्रभाकर सुरकुटला, छाया राजपूत, प्रसाद मांढरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, कोंडीभाऊ फलके, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख आदी.

हे पण पहा –  पोलिसांसमोर पतीला मारले त्यांनी मद्दत केली नाही  – पिडीत पत्नीचा आरोप  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: